

सध्या सुरू असलेल्या भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यावरून सध्या वादळ उठले आहे. त्याच्यावर टीका होत आहे, परंतु अश्विनचे काही चुकलेच नाही. त्याने जे काही केले ते क्रिकेट नियामानुसारच केले. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करण्यासाठी धाव घेत असताना राजस्थान रॉयल्सचा नॉनस्ट्रायकर जोस बटलर पॉपॉग क्रिजच्या बाहेर गेला होता. चेंडू टाकण्यापूर्वीच जोस बटलरने क्रिज सोडले होते. हे लक्षात आल्यावर अश्विनने नॉनस्ट्रायकरकडील यष्ट्यांवरील बेल्स उडवले. पंचांनी बटलरला बाद दिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट नियमांनुसार गोलंदाजाने गोलंदाजी करून चेंडू टाकण्यापूर्वी नॉनस्ट्रायकरने आपले क्रिज सोडता कामा नये. जर नॉनस्ट्रायकरने क्रिज सोडले असेल आणि गोलंदाजाने नॉनस्ट्रायकरकडील यष्ट्यांवरील बेल्स उडवली, तर नॉनस्ट्रायकर धावबाद ठरवला जाईल. आता आयसीसी क्रिकटचे नियम बनवते. पूर्वी मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) क्रिकेट नियम बनवत होती. त्यातही हा नियाम होताच. नॉनस्ट्रायकरला अशापद्धतीन बाद करणारा अश्विन हा क्रिकेट इतिहासातला पाहिला गोलंदाज नाही. 1947 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे विनू मंकड यांनी बिल ब्राऊन याला अशा पद्धतीने धावबाद केले होते. 1992 साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर होता. पोर्ट एलिझाबेथ येथील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पीटर कर्स्टन क्रिज सोडून पुढे जायचा. भारताचा गोलंदाज कपील देव याच्या ते लक्षात आले. त्याने कर्स्टनला सूचना दिली. असे करू नकोस, असे सांगितले. तरीदेखील कर्स्टन कपील देव पुढचा चेंडू टकत असताना क्रिज सोडून पुढे गेला. कपील देवने बेल्स उडवली. पंचांनी कर्स्ट्रनला धावबाद दिले. 2014 श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जोस बटलर अशाचप्रकारे धावचीत झाला होता. श्रीलेकंचा सचित्र सोनानायके याने त्याला अशाप्रकारे धावबाद केले होते. 1987 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेतील वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज सलीम जाफर असाच नॉनस्ट्राकरकडील क्रिज सोडून बाहेर गेला होता, पंरतु गोलंदाज कर्टनी वॉल्शने त्याला बाद केले नाही. वास्तविक वॉल्शने जाफरला बाद केले असते, तर विंडीजने सामना जिंकला असता, परंतु वॉल्शने जाफरला बाद न केल्यामुळे पाकिस्तानने हा सामना एक गडी राखून जिंकला. पाकिस्तानने सामना जिंकला, तरी वॉल्शने लोकांची मने जिंकली. आजही वॉल्श सर्वांना आठवतो. 2012 साली तिरंगी मालिकेत ब्रिस्बेन येथील सामन्यात श्रीलंकेचा लाहिरू थिरीमाने असाच क्रिज सोडून पुढे गेला होता. त्या वेळी गोलंदाज अश्विनने बेल्स उडवले होते, परंतु सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी चार्चा करून थिरीमाने विरुद्ध अपील केले नाही. त्यामुळे पंचांनी त्याला बाद दिले नाही. रविचंदन अश्विन व जोस बटलर यांना हा प्रकार नवीन नाही. बटलर अशाप्रकारे एकदा बाद झाला आहे. अश्विनने एकदा अपील केले नाही. वास्तविक पाहता असा नियम आहे त्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खळणार्या खेळाडूंना नसेल असे होणार नाही. नियम सर्वांना माहीत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नियमच असल्यामुळे त्याचा वापर करून अश्विनने बटलरला बाद केले, तरीदेखील अश्विनवर टीका होत आहे. हा नियम असला तरी अशा प्रकारे नॉनस्ट्रायकरला बाद करणे हे खेळभावनेला धरून नाही, अशी चर्चा होऊ लागली आहे. अश्विनने हे करण्यापूर्वी जर बटलरला किमान एकदा समज दिली असती, तर बरे झाले असते, असे काही लोक म्हणतात. त्यात काही तथ्य नाही. गोलंदाजाने अशा प्रकारे नॉनस्ट्रायकारला धावबाद करण्यापूर्वी किमान एकदा तरी ताकीद द्यावी, असे नियम सांगत नाही. त्यामुळे खेळभावनेचा प्रश्नच येत नही. प्रश्न आहे तो त्या गोलंदाजाच्या विचारसरणीचा. वॉल्शला देखील जाफरला बाद करता आले असते. तो सामना तर विश्वकरंडक स्पर्धेतील होता. कपील देवने देखील कर्स्टनला ताकीद दिल्यानंतर बाद केले. अश्विनने तसे केले नही. त्याला तसे करावे असे वाटले नाही. अश्विनवर टीका करताना बटलरला का विसरतो. बटलरला हा नियम माहीत नव्हता का, तर होता; तो अशाप्रकारे एकादा धावचित झाला आहे. तरी देखील तो क्रिज सोडून पुढे गेला. त्याबद्दल कुणी बोलत नाही. गोलंदाजाने डेंजरझोनमध्ये धावू नये. शरीर भेदक गोलंदाजी करू नये. तसे गोलंदाज करत असेल, तर पंचानी त्याला ताकीद द्यावी. त्याच्या कर्णधाराच्या ही बाब लक्षात आणून द्यावी, असा नियम आहे. तसाच थोडासा बदल क्रिकेट नियम 41.16 मध्ये करायला हावा. गोलंदाज गोलंदाजी करण्यापूर्वीच नॉनस्ट्रायकर क्रिज सोडून जात असेल आणि पंचांच्या हे लक्षात आले असेल, तर पंचांनी त्याला समज द्यावी. त्यानंतर ही जर तो फलंदाज जाणूनबुजून क्रिज सोडून पुढे जात असेल, तर त्याला धावबाद करण्याची संधी गोलंदाजाला असेल, अशी सुधारणा केल्यास वाद होणार नाहीत.