Breaking News

स्टर्लिंग कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

नवी मुंबई ः बातमीदार

नेरूळ येथील एनसीआरडी स्टर्लिंग इनन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच झाला. यामध्ये मुला-मुलींसाठी धावणे, किकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कॅरम व टॅबल टेनिस अशा खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी अमरजित खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश पिंगळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दीपक पोखरकर यांनी केले होते. कोविडमुळे सर्वच क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने व कॉलेजदेखील बंद असल्याने विद्यार्थी दीड वर्ष ऑनलाइन शिक्षण घेत होते. कॉलेज सुरू झाल्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम होत असून त्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply