पनवेल : वार्ताहर
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुस्त.. मात्र रसायनीकर आणि वाहनचालक त्रस्त.. अशी अवस्था रसायनीकरांना आणि वाहनचालकांची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणार्या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, परंतु कुंभकर्णासारखे झोपलेल्या अधिकार्यांना जाग कधी येणार, असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे. दांड-आपटा रस्त्यावर ठिकाणी मोडे खड्डे पडले आहेत. खड्डा चुकवताना अनेक वेळा छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. प्रसंगी काही जणांना जीव ही गमवावा लागला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतेच परंतु वाहनचालकांचे वाहनांचे होणारे नुकसान. प्रवाशांना होणारा नाहक त्रास या ला जबाबदारी ही संबंधित प्रशासन आहे. मोसमी पाऊस लांबल्यामुळे संबंधित प्रशासनाला एक कारण झाले होते, पण आता पाऊस थांबला आहे. मग संबंधित प्रशासनाला रस्ता डागडुजी करण्यास काय हरकत आहे, असा सवाल नागरिक आणि वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे छोटे-मोठे अपघात वारंवार घडतच आहेत, तर या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. काहींना प्राणही गमवावा लागला आहे. त्यामुळे जनतेमध्ये ते तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करा, हा रस्ता सुस्थितीत करा व यापुढे काही विपरीत घटना होऊ नये, अशी खबरदारी संबंधित अधिकार्यांनी घ्यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.