Breaking News

पमपाकडून मालमत्ता करावर पाच टक्के सवलत

ऑनलाइन कर भरल्यास मिळणार दोन टक्के वाढीव सूट

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्तधारकांना आता 31 मार्चपर्यंत मालमत्ता करावर पाच टक्के सूट देण्यात येणार असून ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूटही देण्यात येणार आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित करून देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सुधारित मालमत्ता कर आकारणीवर 31 जुलैपर्यंत 17 टक्के कर सवलत देण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत 84 कोटी 53 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

पालिकेची स्थापना झाल्यानंतर पालिका प्रशासनाने शहराच्या विकासाबरोबरच नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. त्यामुळेच आता पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना 31 मार्चपर्यंत मालमत्ता करांवर पाच टक्के सूट देण्यात येणार असून ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूटही देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply