Breaking News

रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्याचा पोलिसांकडून शोध

पनवेल : वार्ताहर

फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेली रक्कम चार वर्षांत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेल व आजूबाजूच्या भागातील अनेक व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निनाद खानावकर असे या भामट्याचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी निनाद खानावकर (रा. नावडे, तळोजा) याने 2016मध्ये दिशा फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅण्ड इन्वेस्टर्स या नावाने कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर त्याने नावडे परिसरात कार्यालय थाटून त्याच्या कंपनीतील गुंतवणुकीच्या योजनांची जाहिरातबाजी केली होती. फिक्स डिपॉझीट म्हणून गुंतविलेली रक्कम चार वर्षांत हमखास दुप्पट करून देण्याची त्याने योजना त्याच्या कार्यालयातून सुरू केली होती. त्याने केलेली जाहिरातबाजी व दाखविलेला विश्वास याला भुलून पनवेल व आजुबाजुच्या भागातील अनेक व्यक्तींनी त्यांच्याजवळ असलेली लाखो रुपयांची रक्कम निनाद खानावकर याच्या कंपनीत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविली होती.

दरम्यान, गुंतवणुकिच्या या योजनेला 2020मध्ये चार वर्षे पुर्ण झाल्यानंतर काही गुंतवणुकदारांनी निनाद खानावकर याच्या कार्यालयात दुप्पट पैसे घेण्यासाठी धाव घेतली, मात्र त्याचे कार्यालय बंद असल्याचे आढळुन आले. फसवणुक झालेल्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खानावकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply