पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील माजी नगरसेविका निता माळी यांचा कोमसापच्या नवी मुंबई शाखेतर्फे महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. निता कोळी यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी (दि. 20) होणार असून कोपसाप संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री निशिगंधा वाड व नमिता कीर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.