Breaking News

बेलपाडा येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी

महानगरपालिकच्या कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 अंतर्गत बेलपाडा गाव येथील येथील विठ्ठल मंदिरात नुकतेच विशेष बाह्यआरेाग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सचे सहकार्य मिळाले. सुमारे 130 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, बेलपाडा गावचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे, इतर नगरसेवक, मुख्य वैद्यकिय व आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबीरात जनरल तपासणी, लहान मुलांची तपासणी, गरोदर स्त्रियांची तपासणी, किशोरवयीन मुलांमुलींची तपासणी, जेष्ठ नागरिकांची तपासणी, बीएमडी तपासणी, कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण, त्वचा रोग तज्ञ, स्त्रीरोग, रक्त तपासणी करण्यात आली. तसेच रूग्णांना औषधेही देण्यात आली. शिबिरासाठी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी डॉ.पद्मीनी बर्फे, डॉ. अनिल पाटील, डॉ. शुभम पाटील,डॉ. सदाफ लांजेकर, सर्व परिचारिका,वॉर्ड बॉय यांनी परिश्रम घेतले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply