Breaking News

अनामिका खिप्पल ठरल्या ‘मिसेस खारघर’

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

पनेवल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष खारघर व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने 6 ते 20 मार्चदरम्यान आगरी कोळी महोत्सव-2022चे आयोजन करण्यात आले. या दरम्यान मिसेस खारघर स्पर्धा 19 व 20 मार्च रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम विजेती अनामिका खिप्पल, द्वितीय रीना कोटीयन व तृतीय क्रमांक काजल कांबळे यांनी पटकावला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना मानाचा मुकुट, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तर मोस्ट टॅलेंटेड मनोरमा वरगंते, मोस्ट एंटरटेनरमध्ये प्रथम लक्ष्मी डिसोजा, कल्याणी द्वितीय, संध्या घोडविंदे क्लासिक आयकॉन, साक्षी कौरा ब्युटीफूल हेअर, दिशा गुप्ता ब्युटिफुल स्किन, गुडीया मिश्रा परफेक्ट बॉडी, अपर्णा मानसिंग मोस्ट पॉप्युलर, सीमा म्हात्रे मिसेस विवासीएस, अनामिका खिप्पल ब्युटीफुल स्माईल, हर्षा चौधरी ब्युटीफुल आइज, रीना कोटीयन फॅशन आयकॉन, पलक तनवाणी मिसेस फोटोजेनिक, वैशाली जाधव बेस्ट रॅम्प वॉकर यांची निवड करण्यात आली. एन. आर. इन्स्टिट्यूट ऑफ डान्स, नृत्यांजली डान्स कल्चर, आय. एम. फिट डान्स अ‍ॅकॅडमी, मून वॉकर्स डान्स अ‍ॅकॅडमी, धन्वी शास्त्री या कलाकारांनी या स्पर्धेच्या दरम्यान आपले नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. 19 तारखेच्या टॅलेंट राऊंडसाठी दीप्ती मसूरकर, अक्षय जॅक्सन व मनीष देसाई तर 20 तारखेच्या अंतिम दिवशी विद्या घारे, पूनम शर्मा व मंदार तांडेल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मनीता भानुशाली व सुपर्णा चौधरी यांनी ग्रुमिंग मेकअप आर्टिस्ट म्हणून तर संजय शर्मा कोरियोग्राफर यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा मिश्रा, सरचिटणीस दिपक शिंदे, अजय माळी, कल्पना गांधी, जलपा शास्त्री व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. या महोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड भाजप प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल तसेच खारघरमधील सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यांनी महोत्सवाला भेटी दिल्या.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply