Breaking News

पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर

अलिबाग ः प्रतिनिधी

समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भातशेती दमदार  आहे. सध्या हळव्या भातपिकामध्ये दाणे भरले असून ही पिके कापणीच्या अवस्थेत आहेत, मात्र मागील काही दिवस पडत असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भात कापणी लांबणीवर पडणार आहे. काही ठिकाणी भातशेती आडवी झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत आहेत.  साधारणतः दसर्‍यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते, पण मागील तीन दिवस रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टी न झाल्याने पुरामुळे होणारे नुकसान टळले. त्याचा परिणाम पीक दमदार आल्याने शेतकरीवर्ग खुशीत आहे. असे असतानाच पावसाने शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. हा पाऊस शेतीला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस दरवर्षी त्रासदायक ठरतो. सध्या पुढचे काही दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पाऊस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply