Breaking News

जुना ठाणा नाका परिसर झाला प्रकाशित

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ आरक्षित असलेल्या उद्यान परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी त्यांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवल्याने हा परिसर प्रकाशमान झाला आहे. जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ सायंकाळनंतर खूप अंधार असतो. त्यामुळे काही समाजकंटक धुम्रपान, मद्यपान करतात. या ठिकाणी पथदिवे लावण्याची मागणी येथील रहिवाशांनी भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्याकडे केली होती. त्यांनी स्वतःच्या नगरसेवक निधीतून प्रभागातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हायमास्ट दिवे बसवले व त्याचे उदघाटन केले. तसेच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. रहिवाशांनी नितीन जयराम पाटील यांचे आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply