Breaking News

नवी मुंबई पालिकेच्या स्वच्छता अभियानाला तुर्भेमध्ये हरताळ

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तुर्भे कॉलनीतील काही रहिवाशांनी या अभियानाला हरताळ फासले आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडी तुर्भे गावात सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात कचरा घरोघरी जाऊन संकलन करते. तरीही काही नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. महापालिकेतर्फे ठोस कारवाई होत नसल्याने या नागरिकांचे फावले असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेने तुर्भे आयसीएल शाळा येथे सायकल मार्ग बनवला आहे. शाळेच्या मैदानालगतची कचराकुंडी हटवली आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी या कचरा कुंडीच्या समोर सायकल मार्गावर लोखंडी मांडणी ठेवली आहे. असे असले तरी तुर्भे परिसरातील काही रहिवाशी कचराकुंडी काढलेल्या ठिकाणी रात्री कचरा टाकत आहे. कचरा उघड्यावर पडल्याने कुत्री आणि आणि अन्य जनावरे खाद्य शोधतात, त्यामुळे सगळा कचरा सायकल मार्गावर येत आहे. परिणामी या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे.त्यामुळे जागरूक नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करून याला पायबंद घालावा, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे.

 

दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता

या ठिकाणी 2 शाळा आहेत. त्यामध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कचर्‍यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply