Breaking News

खंडाळा घाटातील अपघातप्रवण क्षेत्रात वाहतुकीस मनाई

महामार्ग पोलिसांनी केला दस्तुरी-गारमाळ वळण रस्ता बंद

खोपोली : प्रतिनिधी

खंडाळा घाटात सोमवारी प्रवाशी बसला झालेल्या अपघाताला शॉर्टकटसाठी प्रतिबंध असलेला दस्तुरी वळण रस्ता कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. या दस्तुरी वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून व बॅरिगेट लावण्यात आले आहेत. यामुळे आता प्रयत्न करूनही या धोकादायक रस्त्यावरून उलट दिशेने वाहने आणणे अशक्य झाले आहे.  सोमवारी खंडाळा घाटात बसला झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू आणि 30 प्रवाशी जखमी झाले होते. या घटनेचे मुख्यकारण शॉर्टकटसाठी प्रतिबंध असलेल्या दस्तुरी वळण रस्त्यावरची वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दखल घेत तहसीलदार इरेश चप्पलवार व पोलीस उपअधीक्षक डॉ रणजित पाटील यांनी तातडीने सदर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. तरीही या रस्त्यावरून वाहतूक सुरूच असल्याचे मंगळवारी पुन्हा घडलेल्या अपघाताने स्पष्ट झाले. या बाबतचे वृत्त प्रसिध्द होताच महामार्ग पोलिसांनी बुधवारी (दि. 6) दुपारनंतर एक्सप्रेस वेपासून दस्तुरी -गारमाळ शॉर्टकट फाटा असलेला खंडाळा घाटातील दस्तुरी वळण रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून व बॅरिगेट लावण्यात आले आहेत.

दरम्यान, बस अपघाताबाबत संपूर्ण तपसांती बस चालकाने  मद्य प्राशन केल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच प्रतिबंध असलेल्या धोकादायक रस्त्यावरून बस नेल्याने तीव्र उतारावर ती अनियंत्रित होऊन हा अपघात घडला आहे. त्याला जबाबदार धरून बस चालक बद्रीनाथ पोपट यांच्यावर भादविस कलम 304 (अ)279,337 व 338 आणि मोटार वाहन नियम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply