Breaking News

माथेरानमध्ये निसर्गाची रंगपंचमी…

वसंत ऋतू सुरू झाला कि माथेरानच्या जन्गलात वृक्षाच्या पानांची नवीन पालवी रंगाची उधळण करू लागते. सध्या माथेरान घाट रस्त्यावरील विविध रंगांची उधळण झाडांवरील पालवीने उधळली असून माथेरान घाट रस्त्यात निसर्गाच्या रंगांनी भरून गेला आहे.

निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी प्रत्येक ऋतूत निसर्ग आपली किमया दाखवत आहे. त्यात शिशिर ऋतूत पानगळती होऊन वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटून निसर्गाचे नवीन रूप, येथील निसर्गाची अदभूत लीलया, वसंत ऋतूमधील नैसर्गिक रंगपंचमीच्या छटा, रंगांची उधळण ही नयनरम्य दृश्य येथे आलेल्या पर्यटकांना अनुभवयास मिळणार आहे. माथेरान हे निसर्गाने नटलेले पर्यटनस्थळ असून येथे सर्व ऋतूंत नयनरम्य देखावे आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे येथे पहावयास मिळतात. वसंतपंचमीपासून वसंत ऋतूला सुरवात होते. रंगपंचमी आलेली असताना निसर्ग मुक्तहस्ताने रंगाची उधळण करत असताना येथे दिसतो.

वसंत ऋतूमधील नैसर्गिक अविष्काराने वेगवेगळ्या रंगांची उधळण मुक्त हस्ते केलेली ही नयनरम्य दृश्ये माथेरानच्या जंगलात दिसू लागली आहेत. हिवाळा संपत असताना डोंगरातील गवताने काळसर रंग अंगावर परिधान केला आहे. त्याला आता नवीन साज मिळाला आहे तो वसंत ऋतूमुळे. माथेरानमध्ये डोळ्यांची पारणे फेडणारी वनराई पर्यटकांसाठी महत्त्वाची आहे. वसंत ऋतूमध्ये या डोंगरावर मन अगदी प्रसन्न होते. सर्व ऋतूंतच नयनरम्य देखावे येथे पाहायला मिळतात. सध्या माथेरानच्या वृक्षांनी आपले रूपडे पालटून घेतले आहे. निसर्गातील हा रंगोत्सव डोळ्याचे पारणे फेडतो. डोंगर शिवारामध्ये काटेसावर, पळस अनेक वृक्ष ही आपल्या पूर्ण फुलांनी नजरेस पडत आहेत. फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. हिरव्याकंच असणार्‍या फेडत असतो. कोवळी पाने, गडद लाल पाने, तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करतात. वसंत ऋतूत झाडांची पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा आहे. वसंतोत्सवातील प्रमुख सण म्हणजे रंगपंचमी हा रंगांचा सण आनंद द्विगुणित करणारा आहे.वसंताच्या आगमनाबरोबर निसर्गही रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. वेगवेगळ्या रंगांची मुक्तहस्ते उधळण करतो. कधी वातावरणातील आणि मनातील मरगळ झटकून निसर्गात अनेक ठिकाणी तर कुठे पांगारा, काटेसावर बोगनवेल अशी विविध प्रकारची फुलझाडे बहरतात तेव्हा अवचित आपले लक्ष वेधून घेतात, पण माथेरानचा डोंगरकुशीत त्यांच्या अंगाखांद्यावर फुलांच्या बरोबरच अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो.

सुरुवातीला पानगळ झाली आणि निसर्गात अगदी नैराश्य निर्माण झाले आणि थोड्याच दिवसांत पुन्हा त्या झाडाला नवी पालवी निर्माण झाली. पुन्हा नवचैतन्य निसर्गामध्ये निर्माण झाले आहे. अशा या रंगोत्सवात रंग खेळणारा निसर्ग आज माथेरानच्या अवतीभोवती दिसतोय.

याच माथेरानमधील डोंगर पावसाळ्यात हिरवाईने नटलेला असतो आणि येणार्‍या पर्यटकांना निसर्ग मुक्तहस्ताने रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात झाडांमधून कोवळी पालवी आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला नव्या पालवीने ़फुललेली वनराई रंगांची उधळण करत असताना इथे नजरेस पडते, तर त्याचबरोबर करून रंगेबिरंगी छटा दिवसागणिक बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा नव्याने नव्या उमेदीने दिसतो. कुठे जांभळ्या रंगाच्या जलप्रपात शुभ्र पाण्याचे निर्झर बहरतो. मोगर्‍याची फुले निसर्गाच्या आपला अवतार बदलू पाहत आहे. झाडांची लाल पाने आणि पुढे आणखी एक एक दिवस रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्ववस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा आहे. या ऋतूत माथेरानच्या डोंगर शिवारामध्ये अनेक वृक्षसुध्दा आपल्या पूर्ण फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात व हिरव्यागार झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा आपल्या नजरेस पडतात.हा वसंत ऋतू पक्षासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा महिना पक्षांच्या मनोमिलनाचा असते आणि हे फक्त माथेरानमध्येच पहायला मिळते. यामुळे निसर्गप्रेमी पर्यटक या महिन्यातच माथेरानला भेट देत असतात. माथेरानचा निसर्ग भुरळ घालणारा आहे. या ऋतूत पानगळती अन् झाडांना येणारी नवीन पालवी हे याच ऋतूत पाहयला मिळते. हा वसंत ऋतूतील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करीत असून माथेरानला येण्यासाठी पर्यटकांना खुणावत आहे.

निसर्गाची वेगवेगळी रूपे येथे पहावयास मिळतात. पळस हा वृक्ष फुलतो आणि काटेसावर बहरतो. मोगर्‍याची फुले येथील निसर्गाच्या श्रुंगारात भर टाकतात आणि सुरू होतो तो निसर्गाचा रंगोत्सव. या रंगोत्सवात वसंत ऋतूत झाडाला येणारी नवीन पालवी ही पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत असते. पानगळती झालेल्या पाल्यापाचोळ्यातून चालताना कडक पाला तुटण्याचा होणारा आवाज यामुळे पर्यटक अगदी आनंदी होतात. तर करंज, आंबा, कोलारा या झाडांना आलेल्या नवीन पालवीवर सूर्यकिरणे पडल्यावर पालवी चमकताना दिसते हे खरे पर्यटकांना आकर्षित करतात.

माथेरानच्या जंगलात झाडांची झालेली पानझड आणि दुसरीकडे गुलाबी कोवळी पाने आणि नंतर गडद लाल पाने आणि पुढे आणखी एक एक दिवस रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्ववस्था धारण करतात. हा प्रवास निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा आहे. हा वसंत ऋतू पक्षांसाठीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथील या निसर्गात सकाळपासून बुलबुल, कोळीला, साळुंकी, कूटरुक आणि स्वर्गीय नर्तक या पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो आणि हे सुंदर चित्र सध्या पाहायला, अनुभवायला मिळत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply