Breaking News

नवी मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

61 चालकांकडून 58 हजार रुपयांचा दंड वसूल

नेरुळ ः प्रतिनिधी

नवी मुंबई शहरातील विविध कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांनादेखील आर्थिक दंडाची झळ बसली. या कारवाईत एकूण 61 जणांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली.

राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी 61 केसेस दाखल करीत 58 हजार 500 इतका दंड वसूल केला आहे.

नवी मुंबई शहरातील मनपा मुख्यालय, सिडको, कोकणभवन, वाशी येथील टपाल कार्यालय व महावितरणच्या कार्यालयाबाहेर आरटीओचे कर्मचारी व अधिकार्‍यांनी प्रवेशद्वाराचा ताबा घेत कारवाई केली.

या कारवाईत मोटारवाहन निरीक्षक प्रशांत शिंदे, राहुल गावडे, अविनाश मराठे व इतर कर्मचार्‍यांनी भाग घेतला.

गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये 60 टक्के प्रमाण दुचाकीचालकांचे आहे. मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून नवी मुंबईमधील सर्व सरकारी कार्यालयाबाहेरील कारवाई सातत्याने सुरू असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येईल. – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply