Breaking News

सावित्रीबाई फुले पुरस्काराने प्रतिष्ठित महिलांचा सन्मान

पनवेल ः वार्ताहर

महिला दिनाचे औचित्य साधून क्रियाशील प्रेसक्लब पनवेलतर्फे ’एक दिवस तिचा’ हा कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांना सावित्रीबाई फुले 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर महिला पोलिसांना हळदीकुंकू व साडी देण्यात आली.

या वेळी परिमंडळ-2मधील महिला पोलिसांसोबत ‘खेळ पैठणीचा सन्मान महिला पोलिसांचा’ सिनेअभिनेता जयवंत भालेकर यांच्यासोबत रंगला.  लावणीसम्राज्ञी माया जाधव यांनी ढोलकीच्या तालावर या गाण्यावर नृत्य केले आणि शाहीर शहाजी काळे यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात शकुंतला रामशेठ ठाकूर, रजनी म्हात्रे, प्रीती डाके, तृप्ती सांडभोर, वंदना गुळवे, सुवर्णा दखणे, रश्मी सोनावणे, स्मिता जाधव, ममता म्हात्रे, पद्मिनी पाटील, शुभांगी घरत, अस्मिता पाटील, कविता गायकवाड, कल्पना कोठारी, हरजिंदर कौर सिंग, गीतांजली भगत, भारती कडू यांना सावित्रीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच रायगड जिल्ह्यातील अवघ्या 25व्या वर्षी न्यायाधीश बनलेल्या रुची राजन भगत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास भाजप युवा नेते हॅप्पी सिंग, उद्योजक नरसू पाटील, पत्रकार संजय कदम आदींसह महिलावर्ग उपस्थित होता.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply