Breaking News

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे श्रीवर्धन नगर परिषदेचे दुर्लक्ष

श्रीवर्धन : प्रतिनिधी

चक्रीवादळात नादुरुस्त झालेले श्रीवर्धन शहरातील  सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात एकूण बहात्तर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते व त्याचा डिस्प्ले पोलीस ठाणे व नगर परिषद कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आला होता. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर शहरात एकही चोरीची घटना घडली नव्हती. मात्र श्रीवर्धन, हरिहरेश्वर परिसराला निसर्ग व तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले अनेक खांब पडले, काही सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले तर अनेक कॅमेरे पूर्णपणे फुटले.

सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत नसल्याने शहरात चोर्‍यांच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्याकडे श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत चालू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply