Breaking News

कामोठे भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजप मध्यवर्ती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी उत्साहात करण्यात आली. या वेळी कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कामोठे शहर मंडल उपाध्यक्ष रावसाहेब बुधे, सरचिटणीस शरद जगताप, कामोठे शहर मंडल महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, उपाध्यक्षा रश्मी भारद्वाज, उत्तर रायगड महिला आघाडी भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, शिला भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, बूथ अध्यक्षा मनीषा वनवे, सुरेखा लांडे, श्रुतिका देवरुखकर, कल्पना जाधव, सीमा जगताप, कामोठे शहर मंडल चिटणीस वर्षा शेलार, उत्तर रायगड भाजप सदस्य वनिता पाटील, सदस्या ललिता ढोपलफोडी, महिला मोर्चा सदस्या वैशाली घोलप, अनुसया बंगाले, सुनीता शर्मा, सोमा गुप्ता, युवानेते हॅप्पी सिंग, कामोठे अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस संदीप तुपे, कामोठे शहर मंडल ओबीसी मोर्चाध्यक्ष भाऊ भगत, कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस प्रवीण कोरडे, कामोठे अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष सुरेंद्र हल्लीकर, बुथ अध्यक्ष विजय लोखंडे, अनिल चव्हाण, नारायण सोनावणे, नाना मगदुम कामोठे व्यापारी आघाडी संयोजक, कार्यकर्ते उत्तम जाधव, मल्हारी सकट उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्पाहार अर्पण केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply