उरण ः वार्ताहर
तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या अर्ध पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगर परिषद मुख्याधिकारी संतोष माळी, जि. प. सदस्य विजय भोईर, आरपीआय उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, बौद्धजन पं. स. 843 शाखाध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, सचिव विजय पवार, महेंद्र साळवी, कामगार नेते संतोष पवार, नगर परिषद अधिकारी सुरेश पोसतांडेल, वपोनि. सुनील पाटील, माजी नगरसेवक चिंतामण गायकवाड, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, महेश भोसले, माता रमाई महिला मंडळ अध्यक्षा सुनिता सपकाळे, सर्व सदस्य
उपस्थित होते.