आमदार मनोहर भोईर यांचा निर्धार; नवीन शेवा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा
उरण : रामप्रहर वृत्त
लोकसभा निवडणुकीत मावळमधील शिवसेना-भाजपचे आर.पी.आय.चे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक ांची सभा शिवसेना शाखा नविन शेवा येथे शुक्रवारी (दि. 29) आयोजित केली होती. या वेळी मार्गदर्शन करतांना आमदार मनोहर भोईर पुढे म्हणाले की, सलग पांच वर्ष पांच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकमेव खासदार आहेत. आपल्या खासदारकीच्या पांच वर्षाच्या कालावधीत त्यांनी उरण तालुक्यातील महत्वाचे प्रश्न सोडविले. उरण शहरातील सेफ्टी झोनचा प्रश्न, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा साडेबाराचा प्रश्न, उरण, पनवेल व कर्जत साठी पनवेल शहरामध्ये पासपोर्ट कार्यालय आणण्यासाठी केलेल प्रयत्न, बांधपाडा गावाला विकासात्मक दत्तक घेऊन त्या गावचा कलेले विकास व उरण तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात केलेले कार्य, इ. असे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.असे ते म्हणाले. मंगळवारी 2 एप्रिलला शिवसेना-भाजपचा मेळावा जेएनपीटी उरण मल्टीपरपज हॉल येथे संध्याकाळी 4 वाजता आयोजित केला आहे,या मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठया संख्येन उपस्थित रहावे असे आवाहन आमदार भोईर यांनी केले.
प्रस्तावना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी केली. तसेच सभेस उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत व विभागप्रमुख भूषण ठाकूर हयांनी मार्गदर्शन केले. सभेसाठी उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, प्रदिप ठाकूर, मधुसूदन म्हात्रे, विभागप्रमुख कमलाकर पाटील, संदेश घरत, माजी सरपंच जे.पी. म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, नगरसेविका वर्षा पाठारे, महिला आघाडीच्या ममता पाटील, ज्योती म्हात्रे, सुजाता गायकवाड, वीणा तनरेजा, प्रणिती म्हात्रे, शहर संघटक महेश वर्तक, प्रविण मुकादम, उप-शहर प्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, प्रविण थळी, तसेच उप-विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, बुथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी नविन शेवा शाखेचे शाखा प्रमुख शैलेश भोईर, अशोक म्हात्रे, सुरेश पाटील, प्रकाश म्हात्रे, तुलसीराम म्हात्रे व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.
खासदार बारणे यांच्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजपचे उमेदवार खासदार अप्पा बारणे बहुमताने निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करतील.
-आमदार मनोहर भोईर