Breaking News

वरिहा रावल ठरली एलीट मिस इंडिया

पनवेल ः वार्ताहर

डिव्हेलिशिअस मिर्सेस युनिवर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलिट मिस इंडिया आणि मिसेस इंडिया युनिवर्स मॉडेलिंग स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील वरिहा रावल आणि अनुपम चंदन ह्या विजयी ठरल्या. वरिहा रावल हिने एलीट मिस इंडिया तर अनुपम चंदन हिने डिवॅलिशिअस मिसेस इंडिया युनिव्हर्स 2022 हा किताब पटकावला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

दीपिका रावल यांच्या लवकरच येऊ घातलेल्या फेस ऑफ नवी मुंबई या मॉडेलिंग शोचे लाँच नुकतेच करण्यात आले. या संदर्भात डिवेलिशिअस मिसेस युनिवर्सचे नरेश मदान यांनी माहिती देत विजेत्यांचे अभिनंदन केले. या वेळी बोलताना मारिहा रावत हिने ह्या जिंकलेल्या ’किताबाचे सगळे श्रेय आपल्या आई-वडीलांना दिले व अतिशय आनंदी असल्याचे सांगितले. तर आवड असेल तर माणूस आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो फक्त जिद्द आणि मेहनत असावी असे सांगत डीव्हेलीशीअसं मिर्सेस  इंडिया किताब मिळवलेल्या अनुपम चंदन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply