Breaking News

पनवेल परिसरात मातीच्या माठांना मागणी वाढली

पनवेल ः वार्ताहर

उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठाची मागणी नागरिकांकडून सुरू होते. याच पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील नागरिकांकडून मातीच्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

माठाची मागणी वाढल्याने माठ बनविणारे कारागीर देखील कामात मग्न असल्याचे चित्र पनवेल परिसरात कुंभारवाडा परिसरात व माठ विक्रेत्यांकडे दिसत आहे. पनवेल शहरातील रस्त्यांवर माठ विक्रेते माठ विक्री करीत आहेत आहेत. माठाच्या आकारानुसार 150 ते 300 रुपये दरम्यान माठाचे दर आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीव्रता जरा जास्त असल्याने मातीपासून तयार झालेल्या माठांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply