Breaking News

‘येत्या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार’

मुंबई : आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपला येऊन मिळणार, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा गौप्यस्फोट भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार असून, ते विधानसभेवर तिसर्‍यांदा निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्यात नवे सरकार स्थापन करतील, असे भाकीत केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. शिवसेनेचा एक गट आमच्यासोबत येईल. शिवाय आज अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. उद्या शरद पवारसुद्धा आम्हालाच पाठिंबा देतील, असे राणा म्हणाले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply