उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा 101वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, व्हाईस चेअरमन रामभाऊ घरत, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, वरिष्ठ लेखनिक डि. के. पाटील, कनिष्ठ लेखनिक एस. एम. ठाकूर आदी उपस्थित होते.