Breaking News

आरटीआयएससी फुटबॉल संघाचा पलावा एफसीवर विजय

पनवेल : रामप्रहर वृत्त
ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (टीडीएफए) वतीने खेळविण्यात येत असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) फुटबॉल संघाने पलावा एफसी विरुद्ध 3-1ने विजय मिळवला.
आरटीआयएससी संघाकडून यश डांगे, राहुल रावत आणि कौस्तुभ गुरव यांनी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल केले. याबाबत बोलताना संघाचे व्यवस्थापक कर्तारसिंग अरोरा आणि प्रशिक्षक राशिद खान यांनी सांगितले की, आम्ही संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व यशासाठी कठोर परिश्रम घेत आहोत.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply