Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विश्वरत्न डॉ. बबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांनी गुरुवारी (दि. 14) उत्साहात  साजरी झाली. जयंत्तीनिमित्त विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना माजी खासदार लाकेनेते रामशेठ ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थिती लावली.

उलवे नोड येथे सम्राट अशोक मित्रमंडळ शिवाजी नगर यांच्यावतीने उलवे सेक्टर 10 येथील चांगू काना ठाकूर चौकातून मिरवणूक काढण्यात आली होती. तर उलवे सेना सामाजिक संस्थेने सेक्टर 17 येथे सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या दोन्हीही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी गव्हाण उपसरपंच विजय घरत, भाजपचे कोपर गाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, आशिष घरत, रूपेश पगारे, विकी भिडे, किरण लोहकरे, शेखर काशिद, सचिन आवटे, निलेश महादे, कैवल्य सावंत, चिरंजीव सावंत, आकाश कटावनवरे, संदित सिंग, वैभव दिवेकर,संकेत आवटे यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तर पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, तक्का या ठिकाणी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमांना सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कामोठे वसाहत रहिवाशी संघ, तळा रहिवाशी संघ आणि मित्रमंडळाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी सभा नगरसेवक विजय चिपळेकर, सुजीत पुजारी, प्रविण माने, मयुर मोहिते, राजेश म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, खांदा कॉलनी येथे जय भिम युवा मित्रमंडळ, भिम युवाशक्ती फोर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संदीप डोंगरे, विशाल खंडागळे, नितीन पगारे, दिनेश जाधव, सुरेखा वाघमारे, अनिकेत भंडारे, आशितोष म्हस्के, पनवेल येथ्र किशोर वाहुळकर, आनंद जाधव, राहुल वाहुळकर, अमोल लहाने, दिपक वाहुळकर, संजय जाधव, सचिन किर, गोरख खवले, सुनिल सुर्यवंशी, अनंत वाहुळकर, करण वाहुळकर, सनी वाहुळकर, तक्का येथे नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, युवानेते प्रतिक बहिरा, उमेश खाडे, मंगेश सावंत, मिलींद कांबळे, कुलदीप तांबे, संतोष कांबळे, आनंद चव्हाण, संदेश दिवे, रितेश तांबे, प्रतिक मोहिते, अतुक माने, राजेश तळे, गणेश सोनावणे, महेश कांबळे, नवीन पनवेल येथे नगरसेवक संतोष शेट्टी, किशोर चौतमोल, शिवाजी भगत, अक्षय सिंग यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, आणि भिमसैनिक उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply