Breaking News

मुरूड येथे नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण उत्साहात

मुरुड : प्रतिनिधी

विदिशा एज्युकेशनल केडमी आयोजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या  अध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण मुरूड येथील शिंपी समाजगृहात उत्साहात झाले. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, कामकाजातील चुका कमी व्हाव्यात, कर्मचारी वर्गाला उत्तम ज्ञान अवगत व्हावे, संगणकीय व सहकार धोरण विश्लेषित करून नवीन माहिती पुरविणे, ऑडिटबाबत कोणती पूर्तता करणे या व अन्य बाबी कर्मचारी व संचालक यांना अवगत व्हाव्यात यासाठी विदिशा एज्युकेशन अकॅडमी प्रशिक्षण आयोजित करीत असते. या प्रशिक्षणात योगेश्वरी अर्बन,माजलगाव जिल्हा  बीड, संजीवनी अर्बन जिंतूर जिल्हा  परभणी, मराठवाडा अर्बन जिल्हा  नांदेड, व आदर्श पतसंस्था शाखा मुरुड या सहकारी पतसंस्था चे  पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बँकेचा उद्दिष्टधारीत  कार्य करण्याच्या पद्धती, बँकेच्या समस्या व त्यावरील उपाययोजना व व्यक्तिमत्त्व विकास या घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी  विदिशा एज्युकेशनल केडमी मुरुड चे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,  सहकारातूनच आर्थिक समृद्धीकडे जाता येते. यातूनच समाज व देशाचा आर्थिक विकास साधता येते. यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर व समृद्ध असणे आवश्यक असून बँकांनी सतत प्रशिक्षण घ्यायला हवे, असे मत व्यक्त केले.विदिशा एज्युकेशनल केडमीचे राज्यस्तरीय तज्ञ तथा समन्वयक  हेमकांत गोयजी यांनी सातत्यपूर्ण व्यावसायिक क्षमता समृद्धीचे प्रशिक्षण, ग्राहकाभिमुख सेवा , पारदर्शक व्यवहार व लोकांचा विश्वास जिंकून बँकेचा व्यवसाय वाढविता येतो. यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सतत नव्या गोष्टी शिकत रहाणे आवश्यक असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचे आयोजन विदिशा एज्युकेशनल केडमी, मुरूड यांच्या वतीने करण्यात आले होते. हेमकांत गोयजी  यांनी  तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज केले. तसेच  चेतन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, योगेश पाटील, भास्कर साळावकर, गोरखनाथ राठोड, सुरेश कणसे यांनी प्रशिक्षणाचे व्यवस्थापन केले. परभणी येथील संजीवनी अर्बनचे अध्यक्ष   किरण चव्हाण, माजलगाव बीड येथील  योगेश्वरी अर्बनचे अध्यक्ष  गणेश सौंदर, नांदेड मराठवाडा अर्बनचे  अध्यक्ष उमेश  पावडे  आणि आदर्श पतसंस्था मुरुडच्या व्यवस्थापिका  सुप्रिया राजपुरकर  यांनी अभिप्रायासह आभार व्यक्त करून अशाच प्रकारच्या दर्जेदार प्रशिक्षणाचे आयोजन  झाल्यास दैनंदिन कामकाजास चालना मिळेल असे प्रतिपादन यावेळी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply