Breaking News

निजामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी जागा द्यावी

माणगाव प्रांताधिकारी दिघावकर यांना निवेदन

 

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी, यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर निवेदन देण्यात यांना प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे सोमवारी (दि.18) सकाळी निवेदन देण्यात आले. या वेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे, अध्यक्ष सचिन गंगावणे, सुभाष होवाळ, अशोक गायकवाड, नांगचंद सावंत, जनार्दन सावंत, मनोहर जाधव, कमलाकर गंगावणे, स्वप्नील शिर्के, रामदास सावंत, ललीचंद सावंत, सुंदर गायकवाड, दीपक शिर्के उपस्थित होते. या निवेदनाची प्रत माहितीकरिता संबधित मंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, खासदार, आमदार यांना पोस्टाने रवाना करण्यात आली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकर या थोर पुरुषांचे विचार समाजात तळागाळात पोहचविण्यासाठी तसेच आमचे निजामपूर व त्या विभागातील तमाम बौद्ध बांधवांसह बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांचे प्रबोधन विविध सामाजिक उपक्रम, शिबिरे, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विचार रुजविण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त अशा प्रशस्त जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुद्देशीय सभागृह उभा करण्याचा निजामपूर विभाग बौद्ध बांधवांच्या वतीने व आम्रपाली बौधिष्ठ मित्रमंडळ निजामपूर माणगाव तालुक्याच्या वतीने मानस आहे. तसेच या भागातील तमाम नागरिकांना निजामपूर येथे भवन उभारण्याची इच्छा आहे. यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी असेही या निवेदनात नमूद आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply