Breaking News

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्करप्रमुखपदी निश्चित करण्यात आले आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकार्‍यांच्या श्रेणीत पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वांत वरिष्ठ अधिकारी आहेत. विशेष म्हणजे ‘इंजिनियर कोर’मधील पांडे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. डिसेंबर 2001मध्ये संसदेवरील हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन पराक्रम ही मोहीम राबवली होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य हे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते तेव्हा जम्मूमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पल्लनवाला भागात इंजिनियर तुकडीचे नेतृत्व पांडे यांनी केले होते.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply