Breaking News

एक्सेप्शनल अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्डने तिघांचा सन्मान

मोहोपाडा ः प्रतिनिधी

संगीत, आरोग्य आणि अध्यात्म अशा त्रिवेणी संगमात काम करणारे डॉ. संतोष बोराडे, प्रितिश चौधरी व नरेंद्र भोईर या तिघांना एक्सेप्शनल अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड 2022ने सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाउंडेशन आयोजित दुबई येथील इंटरनेट सिटी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. रत्नधाव फाउंडेशन, महालँड ग्रुप्स आणि सफिर कॉर्पोरेट सर्व्हिस प्रोव्हायडर एलएलसी यांच्या माध्यमातून डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. संगीत आणि आरोग्य क्षेत्रातून व्यापक समाजहिताचा विचार मांडणारे डॉ. संतोष बोराडे (कलोते), प्रितीश चौधरी (चौक) व नरेंद्र भोईर (लोधिवली) यांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी गौरवण्यात आले. आपल्या ’जीवनसंगीत’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे तिघे महाराष्ट्रासह हिंदी, कानडी, उडिया, गुजराती, पंजाबी, बंगाली अशा विविध भाषिक लोकांसमोर आनंदी जगण्याचा एक प्रभावी उपाय मांडत आहेत. भारतातील विविध राज्यांबरोबरच आता त्यांच्या कामाची दखल विदेशातही घेतली जात आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply