Breaking News

महिला मोर्चातर्फे नवीन पनवेलमध्ये अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाल कल्याण विभागामार्फत देशभरात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेलच्या वतीने नवीन पनवेल येथील आंगणवाडी क्रमांक 10मधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घेरत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
संपूर्ण देशभारत कुपोषित बालकांसाठी अंगणवाडीत एकाच वेळी पोषणमूल्य आहार देण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ठरवण्यात आले होते. या संदर्भात भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यामध्ये त्यांनी लहान मुलांना पोषणमूल्य असलेल्या आहाराचे वाटप करायचे आहे. केळी, इतर फळे, चिक्की, ड्रायफ्रूट्स, राजीगिरा व इतर पौष्टिक लाडू, उकडलेली अंडी असे पोषणमूल्य असलेला आहार वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अंतर्गत नवीन पनवेल येथील आंगणवाडी क्रमांक 10मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, मनीषा चिले, बालवाडी शिशिका रेश्मा शेरखाने, पवारम यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply