Breaking News

सीकेटी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्याच्या हेतूने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या एनसीसी विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 14) महाविद्यालयाच्या संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पनवेल रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेनी झाली. यानंतर महाविद्यालयाचे सहयोगी एनसीसी अधिकारी प्रो. डॉ. यु. टी. भंडारे यांनी, दिवसभरातील नियोजित उपक्रमांचा मागोवा घेतला. रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे गुणवंत तथा प्रज्ञावंत बनण्याचा संदेश दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील पोवाड्याचे सादरीकरण झाले. एनसीसी. विभागाच्या सिटीओ प्रा. नीलिमा तिदार यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आकाश पाटील यांनी उपस्थिती दर्शविली. दिवसभरात पुस्तक वाचन, आंबेडकरांच्या जीवनावरील भाषणे, विद्यार्थी संवादसत्र, बौद्धिक सत्र आदींचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या यशस्वी नियोजनासाठी एनसीसी विभागप्रमुख प्रो. यु. टी. भंडारे, सीटीओ प्रा. नीलिमा तिदार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply