Breaking News

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत

ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती

 

नवी मुंबई ः प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 फूट उंचीच्या चार फ्लेमिंगोच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.  नवी मुंबईची नवी ओळख फ्लेमिंगो सिटी अशी करण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाने ही शक्कल लढवली आहे. सेक्टर 10 येथे वनविभागाचे जैवविविधता केंद्र असून येथूनच फ्लेमिंगो सफारीसाठी अनेक जण येत असतात. यातच पालिकेने ऐरोली-मुलुंड मार्गांवर प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे, असा फलकदेखील झळकवला आहे. नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अभियंता संजय देसाई कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते यांच्या संकल्पनेतून आमचे स्थापत्य विभागातील अभियंते व इतर कर्मचारी वर्ग पहिला नंबर येण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवत असल्याचे उपअभियंता संतोष शिकतोडे यांनी बोलताना सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply