Breaking News

पनवेलमध्ये बेशिस्त हातगाड्या व वाहनांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे.

शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक वाहनचालक नो पार्किंग तसेच इतर नियमांकडे दुर्लक्ष करून आपली वाहने उभी करून निघून जातात. याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोहिते यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रविवारी (दि. 20) त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे, सहाय्यक निरीक्षक म्हात्रे, हवालदार खैरावकर, नाईक बी.डी. चवरे, महिला कॉन्स्टेबल एस. पी. कदम यांच्या पथकाने उरण नाका, वडघर पूल, पनवेल शहर परिसरात अशा प्रकारे नियमांचे उल्लघंन करणार्‍या 10 हातगाड्या व 35 वाहनांवर कारवाई केली आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारे कारवाई सातत्याने सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे यांनी दिली.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply