Breaking News

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोचवा

कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आवाहन; खोपोलीत ई-श्रम कार्ड नोंदणी महाअभियान

खोपोली : प्रतिनिधी

संघटीत लोकांसाठी काम करणार्‍या अनेक संघटना आहेत, मात्र असंघटीत कामगार, कष्टकरी लोकांसाठी केंद्रातील भाजप सरकारने ई-श्रम कार्ड योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खोपोलीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत यांनी खोपोली येथे केले. खोपोली शहर भारतीय जनता पक्ष, आपले सरकार सेवा केंद्र, तसेच आत्मदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाटणकर चौकात ई-श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे उद्घाटन भाजप जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप कामगार सेलचे जिल्हा समन्वयक सूर्यकांत देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील कामगारांना ई श्रमकार्ड  योजनेचा फायदा व्हावा, यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. शासन योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच खोपोली नगरपालिकेत जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करतील, अशी  ग्वाही भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी या वेळी दिली. भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, खालापूर तालुका सरचिटणीस वामन धुळे, कामगार संघटना सचिव समिरा चव्हाण, खोपोली शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, खोपोली शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष अनिल कर्णुक, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, महिला मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेटे, जिल्हा कार्यकारणी सदस्या स्नेहल सावंत, शहर उपाध्यक्षा अपर्णा साठे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, चिटणीस सुनिता पाटणकर, सुमिता महर्षी, कोषाध्यक्षा विमल गुप्ते यांच्यासह  इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी महाशिबिराला भेट देऊन उपक्रमाचे स्वागत केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply