नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. या मेळाव्यात 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या 75 हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. युवकांना रोजगार पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे देशातील नागरिकांच्या विकासामध्ये हातभार लागणार आहे, असे निवेदन या मेळाव्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. या मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार सर्व मंत्र्यांच्या खात्यातील मंजूर रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …