पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा अयाोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि दिवंगत दि.बा.पाटील यांच्या सून मनिषा पाटीलयांच्याहस्ते शनिवारी उद्धाटन झाले. या कुस्ती स्पर्धा टेंभोडे येथील मैदानात रंगल्या.पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील मैदानात एकच ध्यास कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्यावतीने ‘महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा अयाोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 30 किलो वजनी गटात अलिबाग येथील सानवी पाटील हिने प्रथम तर खोपोली येथील लावण्या सिंग हिने दुसरा क्रमांक, 40 किलो वजनी गटात खोपोली येथील क्षितीजा मरागजे हिने प्रथम तर ईलबाग येथील मैथीली गावडे हीने द्वितीय, 45 किलो वजनी गटात खोपोली येथील आसती शिंदे हिने प्रथम तर प्रणिता शिंदे हिने दुसरा क्रमांक, 45 ते 53 किलो गटात खोपोली येथील पायल मरगजे हिने प्रथम तर पनवेल येथील वनीता गवंडी हिने दुसरा क्रमांक, 54 ते 59 किलो वजनी गटात खोपोली प्रांजली कुमार हिने प्रथम तर रोशनी परदेशी हिने दुसरा, 60 ते 65 वजनी गटात पनवेल येथील अमेघा घरत हिने प्रथम तर ऋतूजा खेडके हिने दुसरा क्रमांक, 66 ते 71 किलो वजनी गटात ठाणे येथील पोर्णिमा धिडे प्रथम तर अलिबाग येथील सानिका राऊत हिने दुसरा क्रमांक तर 72 ते 76 किलो वजनी गटात खोपोली येथील सानिका सुर्यवंशी हिने प्रथम तर अलिबाग येथील आलेशा कासकर हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. सर्व विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी नगरसेविका विद्या गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, पडघेचे माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील, महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी सरपंच शशिकांत शेळके, काळुराम कडव, सरपंच अशोक गडगे, मंजुळा म्हसकर, शामा काळू पाटील, शनिवारशेठ पाटील, रामभाऊ पाटील, अनंता पाटील, गोमा भोईर, पत्रकार भागवत आहिरे, कुमार लोंढे, पंच गजानन हातमोडे, राजाराम कुंभार, भालचंद्र भोपी, रुपेश पावशे, रुपाली शिंदे-जोगदंड, प्रतिक्षा भोईर-पाटील, प्रसन्न पाटील, जगदीश मरागजे, स्पर्धेचे आयोजक अस्मीता माळी, योगीता भोईर, निखील भूवड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.