Breaking News

आमदार महेश बालदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी

11 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

उरण : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी व भाषण करणार्‍या शिवसैनिकांविरोधात न्हावाशेवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उरणचे आमदार महेश बालदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत हरविणार असल्याचे वक्तव्य करून त्यांना थेट आव्हान दिले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गव्हाणमध्ये बालदी यांच्या आक्षेपार्ह घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. या आंदोलनाचे फेसबुकवर व्हायरल झालेले व्हिडीओ भाजप वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हेमंत ठाकूर यांनी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात हे व्हिडीओ सादर करून तक्रार दाखल केली. याप्रकरणी 11 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या वेळी न्हावा ग्रामपंचायत सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, जयवंत देशमुख, माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर, मदन पाटील, निलेश म्हात्रे, सुधीर ठाकूर, सुहास भगत आदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply