Breaking News

भेंडखळ खाडीत दूषित पाणी; हजारो मासे मृत्युमुखी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण : प्रतिनिधी

तालुक्यातील विविध कंपन्यांमधील दूषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे समुद्रातील, खाडी किनार्‍यावरील मासे हे मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करीत असल्याने अशा दूषित पाणी व मेलेल्या माशांच्या दुर्गंधीने भेंडखळ गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तालुक्यात असलेल्या अनेक प्रकल्पातील दूषित, केमिकलमिश्रीत दुषित पाणी हे समुद्राच्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे वारंवार समुद्रातील मासे हे नागाव, जसखार, धुतूम, चिर्ले, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनार्‍यावर मृतावस्थेत आढळून येत आहेत. या प्रकारामुळे मासेमारी करणार्‍या बांधवांवर उपासमारीचे संकट ओढावत आहे. त्यामुळे याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर

खाडीतील मेलेल्या माशांमुळे व दूषित केमिकल मिश्रीत पाण्याच्या उग्र वासाने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तसेच मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भेंडखळ ग्रामस्थ करीत आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply