Breaking News

तक्का मनपा शाळेत पूर्वतयारी मेळावा; नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या तक्का येथील शाळा क्रमांक 7 मध्ये मंगळवारी (दि. 26) शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी नवविद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांना मार्गदर्शन केले. तक्का येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये शाळा पूर्वतयारी मेळाव्या विविध कार्यक्रमांचे असयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली होती तसेच मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, भाजप नेते मनोहर मुंबईकर, अण्णा भगत, रघुनाथ बहिरा, समद मुकादम, मंगेश भगत, जितू खूटकर, प्रतीक्षा बहिरा, सम्यक ऐज्युकेशनल फोरमचे सदस्य संदीप ठाकूर, पाटेकर, वैभव पाटील आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply