Breaking News

पनवेलच्या चिखलेमध्ये शेकाप, ‘उबाठा’ला धक्का!

ग्रामपंचायत सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये रविवारी (दि. 17) जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे शेकाप आणि उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, माजी सरपंच नामदेव पाटील, हिरामण पाटील, माजी सदस्य रमेश गडकरी, बूथ अध्यक्ष राम फडके, योगेश पाटील, भालचंद्र पाटील, संजय शेळके, निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकाप आणि ‘उबाठा’तील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अविनाश पाटील, मानसी शेळके, वर्षा पंडित यांच्यासह धीरज गडकरी, अनंता पाटील, अनिल पाटील, समिक्षा पाटील, नम्रता पाटील, शांताराम शेळके, नितेश गायकर, निलेश शेळके, माधुरी शेळके, मिलिंद शेळके, नितीन शेळके, प्रियंका शेळके, विनोद पंडित, सुरेश पंडित, सचिन पंडित, सारिका पंडित, संदेश पंडित, राहुल चोरघे, अनिल चोरघे, अविनाश चोरघे, संदेश नारायण पंडित, भावेश पंडित, जिजाबाई चोरघे, किशोर रघुनाथ पंडित, किशोरी पंडित, साहिल शेळके, विघ्नेश शेळके, संदीप पंडित, नंदिनी पंडित, प्रवीण पंडित यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

इश्क इश्क इश्क 50 वर्ष; प्रेमाच्या गोष्टीत देव आनंद चक्क अनुत्तीर्ण

देव आनंदचं पाहणं/ऐकणं/असणं/हसणं/बोलणं/सांगणं/गाणं यात प्रेमाचा मुरंबा/लोणचं/पिझ्झा असं काही भरलयं की हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर प्रेम पाहताना/ऐकताना …

Leave a Reply