Breaking News

रायगड जिल्ह्यात 29 मिमी पावसाची नोंद

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 363.36 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार अलिबाग 2.00 मिमी, पेण 9.00 मिमी, मुरूड 24.00 मिमी, पनवेल 0.00 मिमी, उरण 2.50 मिमी, कर्जत 0.00 मिमी, खालापूर 7.00 मिमी, माणगाव 36.00 मिमी, रोहा 11.00 मिमी, सुधागड 14.00 मिमी, तळा 30.00 मिमी, महाड 30.00 मिमी, पोलादपूर 51.00 मिमी, म्हसळा 88.00 मिमी, श्रीवर्धन 167.00 मिमी, माथेरान 0.40 मिमी असे एकूण पर्जन्यमान 471.90 मिमी इतके आहे. त्याची सरासरी 29.49 मिमी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 11.56 टक्के इतकी आहे.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply