Breaking News

समाजात शांतता टिकविणे महत्त्वाचे

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे प्रतिपादन

माणगाव पोलीस ठाण्यातर्फे इफ्तार पार्टी उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

इफ्तार पार्टीसारख्या कार्यक्रमांतून हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव वाढून समाजात शांतता व बंधुत्वाचा संदेश दिला जातो, असे प्रतिपादन रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी माणगाव येथे केले.

माणगाव पोलीस ठाण्यातर्फे बुधवारी सायंकाळी  पोलीस ठाण्याच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार पार्टीत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे बोलत होते. समाजात शांतता टिकविणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अ‍ॅड. राजीव साबळे, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अस्वार, महिला उपनिरीक्षक अस्मिता पाटील, तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजयआण्णा साबळे, मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुका उपाध्यक्ष महामूद धुंद्वारे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे माजी अध्यक्ष सिराज परदेशी, साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेनभाई रहाटविलकर, मौलाना सैफुल्ला आदींसह  तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply