Breaking News

गव्हाण विद्यालयात सेवापूर्ती सत्कार

गव्हाण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेज मधील उपशिक्षक चंद्रकांत धर्माजी पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या वेळी रयत बँकेच्या वतीने व संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी तथा समन्वय समिती सदस्य अरूणशेठ भगत अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भेट देण्यात आले. विद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा वर्तक हिने रेखाटलेले कॅनव्हास पेंटिंग यावेळी भेट दिले. काही शिक्षकांच्या वतीनेही पाटील सरांना भेटवस्तू देण्यात आलेल्या. सेवानिवृत्ती नंतरही लोकसेवेचे व्रत अंगीकारून आपले समाजाप्रती ऋणानुबंध जोपासावेत असे प्रतिपादन अरूणशेठ भगत यांनी केले.

’ रयत ’  मधील 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती अर्थात सेवापूर्ती निमित्त झालेल्या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना व्यक्त केलेल्या मनोगतात उपशिक्षक चंद्रकांत पाटील यांनी आयुष्यातील  महत्त्वपूर्ण घटनांची माहिती देवून ’ रयत शिक्षण संस्थे ’ बद्दल व ’ रयत को-ऑपरेटिव्ह’  बँकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दीपक भर्णुके यांनी केले. विद्यालयाचे उपशिक्षक सुनिल गावंड, ’रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी आदींनी चंद्रकांत पाटील यांना सेवापूर्ती निमित्त व  आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यास स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी तसेच गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजयशेठ घरत, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.बाबुलाल पाटोळे व सर्व रयत सेवक उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रमोद कोळी यांनी आभार मानले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply