सेंट लुसिया ः वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सलग तिसरा टी-20 सामना जिंकून वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विंडीजने निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली 26 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली.
तिसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 6 बाद 141 धावा करता आल्या. त्यांच्याकडून मोइजेज हेनरिक्सने सर्वाधिक 33 धावा केल्या, तर वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्श ज्युनियरने 18 धावा देऊन दोन बळी घेतले.
विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 38 चेंडूंत सात षटकार आणि चार चौकारांसह 67 धावांची झंझावाती खेळी केली. कर्णधार पूरनने नाबाद 32 धावा केल्या. विंडीजने विजयी लक्ष्य दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलच्या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. गेलने आपली ही दमदार खेळी ड्वेन ब्राव्हो आणि कर्णधार कायरन पोलार्डला समर्पित केली आहे.
गेलने लिहिला नवा इतिहास
वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ख्रिस गेलने टी-20 क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसर्या टी-20 सामन्यात गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा गेल जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी गेलच्या खात्यात 13 हजार 971 धावा होत्या. त्याने 67 धावांच्या खेळीसह 14 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …