Breaking News

मोहोपाड्यात महावितरणाकडून पावसाळापूर्वीच्या कामांना गती

मोहोपाडा ः प्रतिनिधी

पावसाळाजवळ येऊ लागल्याने मे महिन्यापासूनच मोहोपाड्यातील महावितरण कार्यालयाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू होतात. मोहोपाडा महावितरणाचे उपअभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा रसायनी परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू आहेत.

आतापर्यंत महावितरण हद्दीतील रिस ते दांडफाटा, सेबी, शिवनगर, पानशिल, भटवाडी, घोसाळवाडी, एमआयडीसी पाताळगंगा फिडर, भोकरपाडा, बारवई, खानावले, पोयंजे ते ठोंबरेवाडी या परिसरात वीजवाहिन्यांना अडथळा झालेल्या झाडाच्या फांद्या काढण्यात आल्या तसेच खाने आंबिवली, मोहोपाडा वाडी, मातोश्री संकुल येथे डिस्ट्रीब्युशन बॉक्स, शिवनगर सेबी येथील जंपर बदलणे, रिस बौद्धवाडा वीजपोल बदलणे, मोहोपाड्या थांब्याजवळ दोन विजपोल, वायरींग बदलणे, बाळाजी गार्डन येथे ट्रान्सफॉर्मर बदलणे आदी परिसरातील वीजवाहिन्यांना अडथळा ठरणार्‍या फांद्या तोडण्यात आल्या आहेत तर परिसरातील लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या खेचून व्यवस्थित करण्यात आल्या तसेच परिसरात झुकलेल्या वीजवाहिन्या व्यवस्थित करण्याची कामे अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. ऐन पावसाळ्यात रसायनी परिसरातील नागरिकांना काहीही अडचण येऊ नये यासाठी मोहोपाडा महावितरणाकडून पावसाळ्यापूर्वीची विविध कामे सुरू असल्याचे उपअभियंता किशोर पाटील यांनी बोलताना सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply