पेण : प्रतिनिधी
पत्नी नांदायला येत नाही म्हणून तिची पतीने भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 19) पेण तालुक्यातील नवेगाव आदिवासीवाडीजवळ घडली. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कविता दिनेश पवार (22) व तिची बहिण या दोघी सोमवारी दुपारी 3च्या सुमारास रेशन दुकानावरून पायवाटेने चालत परत येत होत्या. त्यांना नवेगाव आदिवासीवाडीजवळ कविताचा पती दिनेश लहान्या पवार (रा. नवेगाव आदिवासीवाडी) याने अडविले. या वेळी दिनेशने पत्नी कविताला तू माझ्यासोबत नांदायला येत नाहीस काय, असे बोलून तिच्या मानेवर, गालावर व उजव्या कुशीत चाकूने वार केला. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …