अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना एका जबरी मारहाणीच्या प्रकरणात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला आहे.
सन 2014मध्ये अलिबाग पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि मारहाण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दळवी यांच्यासह नऊ आरोपी होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयात सुरू होती. त्याचा निकाल शुक्रवारी (दि. 13) लागला.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली, मात्र भा.दं.वि. कलम 324, 143, 147, 148, 504, 506 आणि पोलीस अॅक्ट 135 अन्वये अनिल पाटील, अंकुश पाटील, अविनाश म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी या चौघांना न्यायालयाने दोषी ठरविले, तर उर्वरित आरोपींची मुक्तता केली. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आरोपींच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अपील दाखल होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी …