Breaking News

रिसजवळ आमदार संग्राम जगतापांच्या कारला अपघात

मोहोपाडा : प्रतिनिधी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 17 जवळ रिस हद्दीतील मुंबई लेनवर मंगळवारी (दि. 17) पहाटे पाच वाजताच्या सुमारास बीएमडब्ल्यू कार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. बिएमडब्ल्यु कार एसटीवर आदळताच कारमधील एअरबॅग बाहेर पडल्या आणि कारमधील आमदार संग्राम जगताप आणि कारचालक बचावले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिस पुलाजवळ नगरहून मुंबईच्या दिशेने निघालेली बीएमडब्ल्यू कार (एमएच -16, सिएक्स-0015) हि किलोमीटर 17 जवळ आली असताना याचवेळी एसटी बस कवठेमहांकाळ येथून मुंबईच्या दिशेने जात असताना एसटी बस (एमएच-13, सियु-7460)ला मागून धडकल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातादरम्यान आमदार संग्राम जगताप व त्यांचे कारचालक वाहनांत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कारच्या एअरबॅग बाहेर पडल्या होत्या, मात्र अपघातानंतर कारच्या दोन्ही नंबर प्लेट कारला नसल्याचे दिसून आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply