Monday , February 6 2023

पनवेलच्या कुणाल पाटीलचे बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’यश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये राहणारा व्ही. के. हायस्कूलचा विद्यार्थी कुणाल पाटील याने नुकत्याच अकोला येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत सुयश प्राप्त केले आहे.
कुणालने स्पर्धेत क्लब क्लास (वय 12 ते 13)मध्ये 44 किलो वजनी गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नागपूरच्या रचित सरपाटणे याचा पराभव केला. उपांत्य फेरीत अकोल्याच्या कनक खंडारे याला हरवून अंतिम फेरीत धडक मारली, तर अंतिम फेरीत पुण्याच्या अनिस शेखला मात देऊन सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचा चमकदार खेळ पाहून त्याला सर्वोकृष्ट बॉक्सरचा किताब देण्यात आला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply