Breaking News

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडू चमकले

नवी मुंबई ः बातमीदार

अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे. सुमारे 36 जिल्ह्यांचे 1500पेक्षा जास्त कराटेपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत नवी मुंबईमधील भारती विद्यापीठ शाळेतील यशांजली खरात हिने 18 वर्ष व 68 किलो या गटात रौप्यपदक आणि अँकरवाला शाळेतील विद्यार्थी देवांश पवार याने सात वर्ष व 17 किलो गटात कांस्यपदक मिळवले. त्यांना प्रमुख शिक्षक म्हणून सुरज पुजारी व नवी मुंबई किकबॉक्सिंगचे अध्यक्ष आशिष यांचे मार्गदर्शन लाभले. पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply